ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

*राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत 85% इतके उल्लेखनीय काम*



*महापौर आणि आयुक्त यांनी बालकांना पाजले पोलिओ डोस*

*29 जूनपासून घरोघरी जाऊन उर्वरित बालकांना करणार लसीकरण*

          नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या २६  नागरी आरोग्य केंद्रांमार्फत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, बाजारपेठ, मॉल अशा विविध ठिकाणी ६१५ स्थायी, ७४ ट्रान्झिट व २७ फिरते मोबाईल असे एकूण ७१६ पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. या प्रत्येक बुथवर पालकांनी आपल्या बालकांसमवेत येऊन बालकांना पोलिओचे डोस पाजले.
          नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कुकशेत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी भेट देऊन काही बालकांना पोलिओ डोस पाजले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ राजेश म्हात्रे आणि इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
          'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' - या घोषवाक्यास अनुसरून घरोघरी जाऊन नागरी आरोग्य केंद्रांमार्फत पोलिओ लसीकरण मोहीमेची जनजागृती करून पोलिओ लसीकरणाची माहिती पोहचविण्यात आली होती.
          आज लसीकरण बूथवरील कर्मचारी, स्वयंसेवक यांच्यामार्फत बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या सुयोग्य नियोजनामुळे नमुंमपाचे ८५% इतके उल्लेखनीय काम झालेले आहे. 
          नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १०० % लाभार्थींना पल्स पोलिओ लस मिळावी याकरिता दि २९.०६.२०२६ ते ०३.०७.२०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या बालकांना आज रविवारी बूथवर जाऊन डोस घेता आलेला नाही, अशा बालकांसाठी विशेष मोहीम राबविली जात असून यासाठी घरांना भेट देणा-या नमुंमपामार्फत येणाऱ्या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन  महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.


रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट